थोडक्यात
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत
मुंबईतील 9 महापालिकांसाठी आरक्षण सोडत
वॉर्ड आरक्षित होणार की कायम राहणार?
(Mumbai Municipal Corporation Elections ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईतील ९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत घेण्यात येणार असून आज सकाळी 11 वाजता बाळगंधर्व रंगमंदिर येथे मुंबई महानगरपालिका आरक्षण सोडत होणार आहे. वॉर्ड आरक्षित होणार की कायम राहणार याकडे माजी नगरसेवकांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.
आजच्या या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.