मुंबई

Mock Drill : मॉक ड्रिल दरम्यान सायरन वाजल्यास ट्रेनमधील प्रवाशांनी काय करावे? जाणून घ्या...

उद्या मॉक ड्रिल दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करत असताना अचानक सायरन वाजला तर अशा स्थितीत प्रवाशांनी काय करावे?

Published by : Prachi Nate

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे उद्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलं. एवढचं नाही तर अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानकडून जळफळाट पाहायला मिळाला. पाकिस्तानमधील नेत्यांकडून भारताला पोकळ धमक्या देण्यात आल्या.

याचपार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान दोन्ही देशात युद्ध होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. यादम्यान करोडो लोकांच जीवनचक्र चालवणारी ही मुंबई मॉक ड्रिलसाठी सज्ज झाली आहे. कारण मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या धारेवर असते. त्यामुळे मुंबईत उद्या दुपारी 4 वाजता होणाऱ्या मॉक ड्रिलकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मॉक ड्रिलमध्ये धोक्याच्या परिस्थितीत, युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांनी हल्ला केल्यास काय करावे, याचे नाट्य रुपांतर करत माहिती दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतात हे पाहिलं जातं. यामध्ये सायरन, ब्लॅक आऊट, एअर स्ट्राईक अलर्ट असे प्रशिक्षण दिले जाते. यादरम्यान उद्या अनेक लोक लोकल प्रवास करणार त्यावेळी जर अचानक सायरन वाजला तर अशा स्थितीत तुम्ही काय कराल जाणून घ्या.

हा एक सराव असल्यामुळे अशावेळेस सायरन वाजल्यास तुम्ही घाबरू नका. ज्यावेळेस सायरन वाजेल त्यानंतर तुमच्या जागेवर शांत राहा आणि प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या सूचना दिल्या जातील त्या सुचनांकडे लक्ष ठेवा. तसेच लोकलमध्ये असलेल्या आपत्कालीन उपकरणांची माहिती घ्या. मात्र त्याचा वापर सध्या तरी करु नका. कारण मॉक ड्रिल हा केवळ एक सराव आहे.

त्यासोबत जे वयस्कर तसेच लहान मुल असतील जे या सायरनच्या आवाजाने घाबरलेले असतील त्यांची शक्य तितकी समजूत काढा आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करा. या मॉक ड्रिल दरम्यान कोणत्याही प्रकारची घाबरगुंडी निर्माण होईल अशा अफवा पसरवू नका तसेच त्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाच म्हणजे सरकार किंवा रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी