Mahavikas Aghadi 
Vidhansabha Election

पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगणार?

पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली आहे का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा स्वबळावर लढण्याच सूर असल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रपक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून अद्याप एकमत झालं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला. तसेच भाजपकडून जे कुणी मुख्यमंत्री होतील त्यास पूर्ण पाठिंबा असल्याची आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची घोषणा होते याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे.

थोडक्यात

  • पराभवामुळे महाविकास आघाडीत दुभंगणार?

  • ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा सूर

  • मित्रपक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा न झाल्याचा आरोप

  • मविआत पराजयाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा सुरू?

दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही विधानसभा निवडणुकीतील निकालाचा आढावा घेतला जात आहे. महायुतीतील घटकपक्षांकडून निकालाबाबत विचारमंथन केलं जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यापैकी एकाही पक्षाला २९ आमदार निवडून आणता आले नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळण्याविषयी संभ्रम व्यक्त केला जात आहे. पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली आहे का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा स्वबळावर लढण्याच सूर असल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रपक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत ९५ पैकी केवळ २० उमेदवार निवडून आल्याने नाऊमेद झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे. ‘मातोश्री’वर विजयी आमदारांच्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम न केल्याचा सूर आळवला गेला. तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी लागणाऱ्या २९ जागाही निवडून आणता न आल्याने पराजयाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांचा ठाकरे गटाला फायदा न झाल्याचा आरोप करण्यात आला.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा