India

Mamata Banerjee | ममता बॅनर्जींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा

Published by : Lokshahi News

ममता बॅनर्जी जखमी झाल्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खळबळ माजली होती. ममता बॅनर्जी सध्या कोलकाता याठिकाणी रुग्णालयात भरती आहेत. हाडाला मार लागल्यामुळे त्यांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार नाही. मात्र ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दुपारी एक व्हिडीओ जारी करत असे म्हटले आहे की 13 मार्च रोजी त्या पुरुलियाच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये त्या व्हील चेअरवरुन सहभागी होतील. यावेळी त्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांकडे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

डॉक्टरांच्या मते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तब्येतीमध्ये काहीशी सुधारणा होत आहे आणि त्यांची परिस्थिती सध्या स्थीर आहे. सरकारी एसएसकेएम रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी कार्यरत डॉक्टरांनी ही माहिती दिली. त्यांनी असे म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांच्या काही टेस्ट झाल्या त्याचे अहवाल दिलासादायक आहेत. उपचारामुळे त्यांना फायदा होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर