Mangalprabhat Lodha Wins In Malbar Hill 
Candidates Profile

Mangalprabhat Lodha: मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा विजयी

मलबार हिलमधील विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथून भेरूलाल जैन रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईतील उच्चभ्रू मतदारसंघ असलेल्या मलबार हिल मतदारसंघात मंगलप्रभात लोढा यांना 51645 मते मिळाली आहेत. लोढा यांचा 31613 मतांनी विजय झाला आहे. भेरूलाल चौधरी यांना 20032 मते मिळाली आहेत. 

दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील ही लढत रंगतदार होताना पाहायला मिळाली. या मतदारसंघात उच्चभ्रू नागरिकांप्रमाणेच इथे मराठी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या नाड्या ज्या नेतेमंडळींच्या हातात असतात, त्यातील प्रमुख नेत्यांची शासकीय निवासस्थाने याच मतदारसंघात येतात. ज्यात मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान देखील आहे. इथले विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांना भाजपक़डून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने इथून भेरूलाल जैन यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.

कॉस्मोपॉलिटीन मतदारसंघ

मलबार हिल मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटिन मतदारसंघ म्हणता येईल. उच्चभ्रू इमारतींपासून ते खोताची वाडी सारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या चाळी तसंच गिरगाव, अल्ट्रामाऊंट रोड, नाना चौक असे विविध भाग या मतदारसंघात येतात. वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे लोकं या मतदारसंघात मोडतात. मराठी,गुजराती, जैन, मुस्लिम नागरीक या मतदारसंघातील नागरीक आहे. मलबार हिल मतदार संघात पिण्याच्या पाण्यापासून ते पार्किंगपर्यंत बऱ्याच समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून दिले जात आहे. शिवसेना भाजपची युती असताना हा मतदारसंघ भाजपकडे आला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर लोढांनी आपली पकड मजबूत केली होती. या मतदारसंघातील विविध समीकरणे ओळखत उद्धव ठाकरे यांनी भेरूलाल चौधरी यांना उमेदवारी देण्याचे ठरवले. भेरूलाल हे पेशाने वकील आहेत. हा मतदारसंघ लोढांच्या ताब्यात गेल्याने शिवसेनेची म्हणावी तशी इथे वाढ झाली नव्हती. भेरूलाल हे जैन समाजातले आहेत. मतदारसंघातील गुजराती, जैन समाज; उच्चभ्रू नागरीक, मराठी मते अशी विविध समीकरणे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी भेरूलाल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इथली लढत ही रंगतदार ठरली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल