अध्यात्म-भविष्य

संकष्टी चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

मार्गशीर्ष महिन्यात संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची परंपरा आहे. या तिथीला गणेशाच्या विशेष उपासनेसह उपवास केल्याने अडचणी दूर होतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये लाभ होतो.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Sankashti Chaturthi 2023 : वर्षभरात १२ संकष्टी चतुर्थी येतात. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे, त्याला अगाहन महिना असेही म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची परंपरा आहे. या तिथीला गणेशाच्या विशेष उपासनेसह उपवास केल्याने अडचणी दूर होतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये लाभ होतो. संकष्टी चतुर्थी या नावाप्रमाणेच साधकाच्या सर्व संकटांचा नाश करणारी मानली जाते. या वर्षी 2023 च्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीची तारीख, पूजा शुभ वेळ आणि चंद्रोदय वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:24 वाजता सुरू होईल आणि 1 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 03:31 वाजता समाप्त होईल.

गणपती पूजा मुहूर्त - सकाळी 6.55 ते 08.13

संध्याकाळची वेळ - सकाळी 04.05 - 07.05

मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ

चंद्राला अर्घ्य दिल्यावरच संकष्टी चतुर्थीचे व्रत सफल होते. मार्गशीर्षाच्या गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ०७.५४ मिनिटांनी चंद्रोदय होईल. चंद्राची उपासना केल्याने मानसिक शांती मिळते. चंद्र दोष दूर होतो.

संकष्टी चतुर्थीला गणपती पूजेचे फायदे

विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करतात. या व्रताचा महिमा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत करतो तसेच संतती होण्यासाठी या व्रताचे खूप महत्त्व आहे. अविवाहित मुली देखील चांगला नवरा मिळावा म्हणून दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गणपतीची पूजा करतात. हे व्रत सर्व संकट दूर करणारे मानले जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."