India

MeToo: एम.जे. अकबर यांना न्यायालयाचा झटका

Published by : Lokshahi News

माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांना उच्च न्यायालयात मोठा झटका दिला आहे.मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने त्यांना हा झटका बसला आहे.

एम.जे. अकबर यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला होता. या दाव्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

दिल्लीतील 'राऊज एव्हेन्यू'च्या विशेष न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी केली. याच प्रकरणात निकाल देताना दिल्ली न्यायालयानं एम जे अकबर यांचे आरोप फेटाळताना प्रिया रमानी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यास नकार दिलाय.

सुनावणीवेळी दिल्ली हायकोर्टाने प्रिया रमाणी यांची निर्दोष मुक्तता करत, कितीही दशकं झाली तरीही महिलांना आपली तक्रार मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे महत्वपूर्ण मत नोंदवले.

प्रकरण काय?

२०१८ साली सुरू झालेल्या 'मी टू' या ऑनलाईन चळवळी दरम्यान पत्रकार प्रिया रमानी यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यामुळे एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. यामुळे चिडलेल्या अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद