Business

टोकियो पॅरालिम्पिक्स विजेत्या भाविना पटेलला MG मोटरकडून ‘हेक्टर’ भेट

Published by : Lokshahi News

टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल यांना एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट दिली आहे. भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा-अॅथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे.

"मी एमजी मोटर व वडोदरा मॅरेथॉन यांच्या या विचारशील गेस्चरचे कौतुक करते. मला ही पूर्णत: कस्टमाइज्ड हेक्टर माझ्या मालकीची असण्याचा खूप आनंद होत आहे. ही आकर्षक वेईकल आपल्या गतीशीलता परिसंस्थेमधील अग्रणी नवोन्मेष्कार आहे. मी ड्रायव्हरच्या आसनावर या वेईकलची क्षमता अनुभवण्यास खूपच उत्सुक आहे. गतीशीलतेसह ही आकर्षक कार मला स्वावलंबीपणा व सक्षमीकरणाची भावना देते, असे ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल म्हणाल्या आहेत.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, आज आम्हाला टोकियोमध्ये देशाचे नावलौकिक केलेल्या भाविना यांच्यासाठी आमची एमजी हेक्टर कस्टमाइज्ड करण्याबाबत सन्माननीय वाटत आहे. यासह आम्ही त्यांचे धैर्य व निर्धाराला सलाम करतो. त्यांनी सर्व विषमतेवर मात करत संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. महिला सक्षमीकरणाप्रती त्यांचे योगदान अद्वितीय आहे. आम्ही आशा करतो की, त्या आमच्या प्रशंसनीय भेटीचा आनंद घेतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा