Konkan

”एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी”; आमदार रविंद्र चव्हाणांचा गंभीर आरोप

Published by : left

सुरेश काटे | भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करत एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपावर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई भाजप कार्यलयात भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील  काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच आहेत,शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप रविंद्र चव्हाण यांनी केला आहे.

या वक्तव्याला शिवसेनेचे युवा जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे तारणहार हे पालकमंत्री आहेत त्यांनी एक हजार 900 कोटी रुपयांचा निधी गेल्या दोन वर्षांमध्ये या शहरासाठी दिला आहे आणि पालकमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या शहराचे विकास पुरुष आहेत आणि जे लोक टीका करत आहेत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आता काही उरलेलं नाही म्हणून ते लोक टीका करत आहेत. आम्ही अशा टिकांना महत्त्व देत नाहीत, नसल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला