India

Modi cabinet expansion | वाचा कोण आहेत भागवत कराड?

Published by : Lokshahi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कराड यांची ओळख आहे.

डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.

1990 मध्ये 'डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर' या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे

भागवत कराड यांचा प्रवास
-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक
-1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर
-2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर
-2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक