IMP Events of 2025 
Bye Bye 2024

New Year: पंचांगकर्ते, खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितल्या नववर्षातील महत्त्वाच्या घटना

सन 2025 मध्ये खग्रास चंद्रग्रहण, दोन सुपरमून, कुंभमेळा, आणि इस्रोचे गगनयान मिशन यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी नववर्षातील या घटनांची सविस्तर माहिती दिली आहे.

Published by : Gayatri Pisekar

थोडक्यात

  • नूतन वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती

  • इस्रो अंतराळवीरांसह गगनयान अंतराळात पाठविणार

  • भारतातून एकच खग्रास चंद्रग्रहण दिसणार

  • प्रयागराज येथे कुंभमेळा भरणार

  • दोन सुपरमून दिसणार

नववर्षातील काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. पंचांगकर्ते, खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी होणार आहे. 31 डिसेंबरला लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन 2025चा प्रारंभ ठीक रात्री 12 वाजता होणार असल्याचेही दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले.

सन 2025 मधील विशेष घटनांची माहिती दा.कृ.सोमण यांनी करून दिली.

  1. सन 2025 मध्ये जरी 25 सुट्ट्या जाहीर झाल्या असल्या तरी 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत आणि स्वातंत्र्यदिन-पारसी न्यू इयर एकाच दिवशी आले आहेत. तसेच दसरा आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने चाकरमान्यांच्या एकूण 6 सुट्ट्या बुडणार आहेत.

  2. सन 2025 मध्ये 2 सूर्यग्रहणे (29 मार्च,21 सप्टेंबर) आणि 2 चंद्रग्रहणे (14 मार्च, 7 सप्टेंबर) अशी चार ग्रहणे होणार असली तरी 7 सप्टेंबरचे खग्रास चंद्रग्रहण तेवढेच भारतातून दिसणार आहे.

  3. पुढच्या वर्षी 5 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर असे दोन सुपरमून दिसणार आहेत. सुपरमूनच्यावेळी चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसतो.

  4. नूतन वर्षी 12 ऑगस्ट रोजी एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहे.

  5. नूतनवर्षी 24 जुलै, 21 ऑगस्ट आणि 18 सप्टेंबर असे 3 गुरुपुष्यामृत योग येणार आहेत.

  6. नूतन वर्षी विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. जाने.5 फेब्रु.11, मार्च 8, एप्रिल 8, मे 14, जून 5 नोव्हें.5 आणि डिसे.2 असे एकूण 58 विवाह मुहूर्त आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टे., ऑक्टो. विवाह मुहूर्त नाहीत.

  7. नूतनवर्षी 19 मार्च ते 22 मार्च आणि 14 डिसेंबर ते 30 जाने. शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. 13 जून ते 6 जुलै गुरू ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही.

  8. नूतनवर्षी सर्व सण-उत्सव हे सन 2024 पेक्षा 11 दिवस लवकर येणार आहेत. सन 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक महिना आल्यावर सर्व सण पुढे जातील.

  9. नूतनवर्षी मकरसंक्रांत 14 जानेवारीला येणार आहे. मकर संक्रांती 2085 पासून 15 जानेवारीला आणि 2100 पासून 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती 1 फेब्रुवारीला येणार आहे.

  10. नूतनवर्षी प्रयाग येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रूवारी कुंभमेळा भरणार आहे.

  11. नूतनवर्षी भारताची इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था चार अंतराळवीर आणि व्योममित्रा ही रोबोट महिला घेऊन गगनयान अंतराळात यशस्वी उड्डाण करून परत पृथ्वीवर सुखरूप परत येणार आहेत.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?