दररोज आपण गुगलवर काही न काही सर्च करत असतो. सध्या ट्रेडिंग काय आहे किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ, एखाद्या सेलिब्रिटीविषयी माहिती असं बरंच काही आपण गुगल करत असतो. दरवर्षा अखेरीस या सगळ्या मोस्ट सर्च शब्दांचा डेटाबॅसचा अहवाल गुगल जाहीर करते. यंदाचा Annual Search Report गुगलने जाहीर केला आहे. या रिपोर्टमुळे आपल्या भारतीयांनी या वर्षामध्ये सर्वात जास्त गुगलवर काय सर्च केलं त्याची माहिती आपल्याला कळते.
भारतीयांनी या वर्षी सर्वात जास्त सर्च केलेली गोष्ट म्हणजे स्पोर्ट इवेंट्स आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि दुसऱ्या नंबरवर टी-२० वर्ल्ड कप आहे. या वर्षातील टॉप १० सर्चेस कोणत्या होत्या ते आपण पाहुयात-
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)
टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup)
भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party)
निवडणूक निकाल 2024 (Election Results 2024)
अतिउष्णता (Excessive Heat)
रतन टाटा (Ratan Tata)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress)
प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League)
इंडियन सुपर लीग (Indian Super League)
मनोरंजन क्षेत्रातील टॉप सर्चेस
स्त्री- २ हा हॉरर कॉमेडी सिनेमा सर्च केला गेला. 12th Fail सारखा सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमाविषयी सर्च करण्यात आलं. हिरामंडी, मिर्जापूर, 'द लास्ट ऑफ अस' सारख्या सिरीजविषयी सर्च करण्यात आलं. तसेच 'क्वीन ऑफ़ टियर्स'मुळे भारतीयांमध्ये के ड्रामाचीही तेवढीच क्रेझ आहे हे लक्षात येतं. संगीत क्षेत्रात नादानियाँ, ये तूने क्या किया हे ट्रॅक्स सर्च केले गेले.
Google चा हा अहवाल एक प्रकारे भारतीयांच्या काळानुरूप बदलणाऱ्या अभिरूचीचा आरसा आहे. डिजिटल युगात बदलत जाणाऱ्या आवडीनिवडी आणि नवीन ट्रेंड्सचे भारतीय नेहमीच स्वागत करतात हे लक्षात येतं.