Delhi Capitals Vs Mumbai Indians 
IPL T20 2021

IPL 2022: आज मुंबई विरूद्ध दिल्ली लढत; कोणाचं पारडं जड?

Published by : Vikrant Shinde

IPL 2022: IPL च्या 15व्या हंगामाला सुरूवीत झाली आहे. यंदाच्या हंगामातील दुसरा सामना हा मुंबई (Mumabi Indians) विरूद्ध दिल्ली (Delhi Capitals) असा रंगणार आहे. दरम्यान IPL जरी काल(26-03-2022) सुरू झाली असली तरी मुंबईकरांसाठी आणि देशभरातील मुंबई आणि दिल्लीच्या चाहत्यांसाठी IPL ची खऱ्या अर्था सुरूवात ही आज (27-03-2022) होणार आहे.

दरम्यान, IPL मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं याचं कारण म्हणजे, मुंबईच्या संघानं आजपर्यंत सर्वाधिक म्हणजेच 5 वेळा उचलला IPL जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. यंदाचं वर्ष मात्र काहीसं वेगळं ठरू शकतं कारण यंदा मेगा ऑक्शन (Mega Auction) झाल्यानं सर्वच संघांत मोठे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. पण तरीही मुंबईच्या संघातील काही महत्तवाचे खेळाडू मुंबईच्याच संघात असल्याने व त्यात आणखी नव्या खेळाडूंची भर पडल्याने मुंबईचा संघ यंदाही वरचढ ठरू शकतो असं मुंबईच्या चाहत्यांचं तसंच तज्ज्ञांचं मत आहे.

तर, दुसरीकडे दिल्लीच्या संघातही यंदा अनेक मोठे चेहरे दिसणार असल्याने दिल्लीचा संघही 'हम भी किसीसे कम नही' असं म्हणत मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणत्या संघाचं पारडं जड आहे हे सांगणं जरी कठीण असलं तरीही आजचा हा सामना पाहणं प्रेक्षकांसाठी मात्र पर्वणीच ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा