मुंबईची लाईफलाईन म्हणून संबोधली जाणारी मुंबईतील ट्रेन अर्थात मुंबई लोकल दररोज लाखो प्रवाशांचा भार आपल्या खांद्यावर वाहत असते. परंतू मागील काही काळात उपनगरांतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आता पश्चिम रेल्वेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.
पश्चिम उपनगरांत मागील काही वर्षांत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. या वाढत्या प्रवासी संख्येकरिता आता पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट दरम्यान धावणार्या जलद लोकलचे डबे बाराहून पंधरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच चालू वेळापत्रकात बदल करून अजून 27 फेऱ्या विरार ते चर्चगेट चर्चगेट दरम्यान चालवण्याचा विचार पश्चिम रेल्वेने प्रशासनाने घेतला आहे, यामुळे विरार ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी पिक-अवरच्या काळात बोरिवली, मीरारोड, भाईंदर, नायगाव वसई, नालासोपारा या स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. आता विरार ते अंधेरी या मार्गावरील स्थानकांची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गावर लोकल सुरू करणे शक्य होणार असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने बारा डब्यांच्या ऐवजी आता लोकलला 15 डबे जोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.