Murlidhar Mohol on Mahayuti Admin
Vidhansabha Election

"महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत येणार", मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य

"महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत येणार असून महायुतीचा 218 जागांवर विजय होणार" असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

Published by : Team Lokshahi

"महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत येणार असून महायुतीचा 218 जागांवर विजय होणार" असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

"राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण असून पुन्हा महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर येणार आहे आणि आम्ही 218 जागा विजयी होऊ" असा विश्वास केंद्रीय विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केला.

सांगलीचे भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचार कार्यालयाचे मंत्री मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक करीत राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांमुळे राज्यातील जनता आमच्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटलं. तसेच सांगली मिरजेसह राज्यातील 218 ही जागा आम्ही जिंकू असे वातावरण असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील जनता महाविकास आघाडीला स्वीकारणार नाही असा दावाही मंत्री मोहोळ यांनी केला.

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच मराठा समाजाला आरक्षण देईल आणि तेवढी धमक शिंदे फडणवीस आणि पवार यांच्यात आहे असे म्हणत मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार आहे ते त्यांनी नक्की करावे असा सल्लाही मोहोळ यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा