Ganesh Utsav 2021

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; महाराष्ट्राच्या सांगितिक परंपरेच्या आठवणी झाल्या जाग्या

Published by : Lokshahi News

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव उत्साहात सूरू आहे. या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राच्या एकसष्ठीनिमित्त सांगितिक परंपरेचा वेध घेतला गेला. या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या सांगितिक परंपरेच्या आठवणी जाग्या झाल्या.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्ठीनिमित्त भूपाळीपासून पोवाड्यापर्यत आणि गणगवळणीपासून भारूडापर्यत वैविध्यपुर्ण गाण्याची पर्वणी गणेशभक्तांनी अनुभवली. अंजली मराठे, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, स्वरदा गोडबोले आदींनी याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार आहे. ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा 'हरि–प्रसाद', हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा कार्यक्रम लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IPL News : रोहित-विराटनंतर आणखी एक धक्का! CSK मधील स्टार खेळाडूने केला IPL ला गुडबाय

PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार; शेतकऱ्यांसाठी दिलासा की नव्या अडचणींचा इशारा?

Latest Marathi News Update live : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन विरार कडे ट्रेन ने रवाना

Ganeshotsav 2025 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार; एका कृतीनं वेधलं लक्ष