India

Mysuru gang-rape : ५ संशयितांना अटक; तामिळनाडूमधून घेतलं ताब्यात

Published by : Lokshahi News

कर्नाटकाच्या म्हैसूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तामिळनाडूमधून ५ संशयितांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिला आणि तिच्या मित्राला संशयितांचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवरून पाठवले आहेत. पीडित तरुणीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून ती आपल्या घरी मुंबईला परतली आहे. तेथूनच ती पोलिसांना चौकशीसाठी मदत करणार आहे.

आरोपींचा गट नियमितपणे म्हैसूरला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना लुटायचे आणि शहरात चोरी करायचे. चोरी केल्यानंतर परत जात असताना ते ललिताद्रिनगर (उत्तर) परिसरातील टेकडीवर पार्टी करत असत. यावेळी ते परत जात असताना त्यांच्या नजरेस पीडिता आणि तिचा मित्र पडले. यावेळी त्या दोघांना धमकावत पैशांची मागणी केली आणि तिच्यावर बलात्कार केला.

नेमकं काय घडलं?
कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर म्हैसूर आहे. म्हैसूर शहरापासून 13 किलोमीटर दूर असलेल्या चामुंडी टेकडीवर पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. दोघेजण एकांतात बसले होते. यावेळी आरोपींनी त्या दोघांचे मोबाईलवर खासगी क्षण चित्रित केले. आरोपी दोघांजवळ गेले आणि त्यांना व्हिडिओ दाखवत धमकावले. पीडितेकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाने ते दोघेही घाबरले होते. आपल्या जीवासाठी त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र, 2 वाजेपर्यंत पैशांची जुळवाजुळव पीडित करू शकले नाही. यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी तरुणाला दगडाने मारले. दोघांना मरणाअवस्थेत सोडून पीडितेचा मोबाईल घेत आरोपींनी पळ काढला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर