काल 5 राज्यांतील निवडणूकांचे निकाल लागले. केवळ पंजाब वगळता इतर चारही राज्यांत भाजपने मुसंडी मारलेली पाहायला मिळतेय. ह्यानंतर भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांकडून हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. तर, विविध पक्षातील विविध नेत्यांकडून संमिश्र अशी प्रतिक्रीया समोर येतायत.काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी आता भाजपच्या या विजयावर प्रतिक्रीया दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यध नाना पटोले "भाजपने विजयाचा गर्व करू नये, 2024 मध्ये 2 खासदारांची पार्टी व्हायला भाजपला वेळ लागणार नाही" अश्या शब्दांत काल आलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री अस्लम शेख?
दरम्यान, काँग्रेस नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही या निकालावर प्रतिक्रीया दिली आहे. "उत्तर प्रदेशात झालं ते महाराष्ट्रात होणार नाही… मुंबई आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांवर हे निकाल परिणाम करणार नाही" अशा शब्दांत अस्लम शेख ह्यांनी विश्वास व्यक्त केला.