राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी अनेक माध्यमांमध्ये प्रसि्द्ध झाली आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याचे खुद्द निशा दिहिया हीने व्हिडीओ शेअर करून सांगितले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निशावर अज्ञातांनी अचानकपणे गोळ्या झाडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या हल्ल्यात निशाच्या भावाचादेखील मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी आहे. या आशयाची बातमी सर्व प्रसि्द्धी माध्यमांमध्ये झलकत आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.
कुस्तीपटू निशा दिहिया हीने व्हिडीओ शेअर करून सांगितले की, मी मी ठीक असून ती फेक न्यूज असल्याचे तिने सांगितले आहे.