Vidarbh

नवनीत राणा दर्यापूरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक? 'तुम्ही हाक द्या, मी साथ देईन' अशा आशयाचे झळकले पोस्टर्स

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

Published by : Team Lokshahi

सूरज दहाट, अमरावती

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा दर्यापूरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे. 'तुम्ही हाक द्या, मी साथ देईन' अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा अडसूळ विरुद्ध राणा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पोस्टरवर दर्यापूर विधासभा क्षेत्रात आपण मला मतदान केल्याबद्दल आपले आभार. मी सदैव आपली ऋणी राहणार व असेच आपले आशीर्वाद माझ्या पाठिशी राहू द्या. याच आशीर्वादामुळे मला नेहमी आपली सेवा करण्याची शक्ती मिळते. मला पूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा आहे. तुम्ही हाक द्या, मी साथ देईल असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा