नवरात्री 2024

Navratri 2024: अन् अशी निर्माण झाली दुर्गेची दैवी शक्तीपीठे, किती आहेत ही शक्तीपीठे जाणून घ्या...

देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. देवीची शक्तीपीठे आणि रुपे जरी अनेक असली तरी ती एकाच रुपाची अनेक रुपे आहेत.

Published by : Team Lokshahi

नवरात्री अवघ्या काही दिवससांवर येऊन ठेपली आहे अनेक मंडळामध्ये तयारी देखील सुरु झाली आहे. दुर्गेच्या महिमेवर अनेक कथा आपण ऐकूण असाल देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून अखेर दहाव्या दिवशी त्याच्या वध केला जो दिवस हिंदू धर्मात दसरा म्हणून ओळखला जातो. तर देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. देवीची शक्तीपीठे आणि रुपे जरी अनेक असली तरी ती एकाच रुपाची अनेक रुपे आहेत. तसेच दुर्गेचे अनेक रुपे देखील आहेत दुर्गेचे एकूण 51 शक्तीपीठे आहेत. मात्र ही शक्तीपीठे कशी तयार झाली याबद्दल तुम्हाला माहित आहे का? यामागे देखील एक कथा आहे ज्यामध्ये देवीच्या पहिल्या जन्मापासून ते तिच्या 51 शक्तीपीठांची कथा आहे.

दुर्गेची 51 शक्तीपीठे निर्माण कशी झाली:

पर्वतांची राजा कन्या पार्वती हिचा पहिला जन्म हा प्रजापती दक्षची कन्या सती हिचा होता. प्रजापती दक्ष हे श्रीविष्णूचे खुप मोठे भक्त होते मात्र त्यांची कन्या सती ही भगवान शंकरावर भुललेली होती आणि गोष्ट दक्षला आवडत नव्हती. दक्ष हा जितका मोठा श्रीविष्णूंचा भक्त होता तितकाच तो भगवान शंकरांचा तिरस्कार करायचा. एक दिवशी सतीने तिच्या पित्याकडे म्हणजेच दक्षकडे भगवान शंकरासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली आणि यावर दक्षने तिला साफ नकार दिला. मात्र तरी देखील सतीने शंकारासोबत विवाह केला आणि एक दिवशी प्रजापती दक्षने त्याच्या घरी एक यज्ञ ठेवले होते त्याचे आमंत्रण देवतांमध्ये तसेच ऋषिमुणींमध्ये सगळ्यांना बोलावलं होते मात्र सती आणि शंकराला त्याचे आमंत्रण दिले गेले नव्हते.

मात्र तरी देखील सती वडीलांच्या यज्ञात जाण्याचा हट्ट भगवान शंकराकडे करते यावर शंकर तिला जाण्यास परवानगी देतात आणि तिथे गेल्यावर प्रजापती दक्ष संपुर्ण सभेसमोर सती आणि भगवान शंकरांचा अपमान करतो. हा अपमान सती सहन करू शकत नव्हती त्यामुळे तिने तेथे सुरु असलेल्या यज्ञाच्या पोटत्या अग्निकुडांत स्वतःचे शरीर त्यागून देते आणि त्यात तिचा मृत्यू होतो. ही गोष्ट ज्यावेळेस भगवान शंकराला समजते ते सतीचे मृत शरीर स्वतःच्या हातात घेऊन अवकाशात जात असतात सतीचे शरीर इतके तापलेले असते आणि भगवान शंकरांचा क्रोध ही खुप वाढलेला असतो त्यामुळे संपुर्ण जग अग्नित पेटले असते त्यामुळे यावर उपाय म्हणून श्रीविष्णूंनी सतीच्या मृत शरीरावर त्यांचे सुदर्शनचक्र फिरवले आणि देवीचे 51 तुकडे केले. हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्याठिकाणी देवीची शक्तीपीठे तयार झाली आणि अखेर सतीने पर्वत राजाची कन्या पार्वतीच्या रुपात पुनर्जन्म घेतला आणि शंकरासाठी तप करुन आराधना करुन शंकरासोबत विवाह केला.

त्याआधी जाणून घ्या देवीची 51 शक्तीपीठे कोणती:

हिंगलाज, साखर माता, सुगंधा-सुनंदा, महामाया, सिद्धिदा, त्रिपुरा, मालिनी, जयदुर्गा, महामाया, दाक्षायणी, असाधारण, गंडकी, चंडिकामांगल्य, चंडिकात्रिपूर, सुंदरी, भवानी, भ्रामरी, कामाख्या, ललिता, भूतधात्री, जयंती, कालिका, विमला, विशालाक्षी, सर्वानी, सावित्री, गायत्री, महालक्ष्मी, देवगर्भ, देवी काली, नर्मदा, शिवानी, उमा, नारायणी, वाराही, अपर्णा, श्रीसुंदरी, कपालिनी, चंद्रभागा, अवंती, भ्रामरी, स्थान गोदावरतीर, मिथिला, कालिका, तारापीठ, जयदुर्गा, महिस्मर्दिनी, यशोरेश्वरी, फुलारा, नंदिनी, इंद्राक्षी ही देवीची 51 शक्तीपीठे आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा