नवरात्री 2024

Navratri 2024: यंदा नवरात्री 9 दिवस नाही तर 10 दिवस होणार साजरी; जाणून घ्या कधी आहे घटस्थापना?

गुरुवार ३ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. यादरम्यान घटस्थापना कशी करावे ते जाणून घ्या...

Published by : Team Lokshahi

नवरात्री अवघ्या काही दिवांवर येऊन ठेपली आहे. गणपतीनंतर आनंदाचा उत्साहाचा आणि मौजमस्ती करण्याचा सण म्हणजे नवरात्री नवरात्री दरम्यान आपण देवीची 9 ची दिवस मनोभावे सेवा करतो. तर या दिवसात 9 दिवस गरबा दांडीया आणि इतर खेळ खेळले जातात. तसेच 9 दिवस नऊ रंगांचे वेगवेगळे कपडे सुद्धा परिधान केले जातात. तसेच नवरात्रीत आपण अनेक अशा गोष्टी पाहतो. नऊ दिवस वेगवेगळे रंग परिधान करण्यामागे देखील प्रत्येक रंगाची अशी एक कथा आहे. गुरुवार ३ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल.

घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य:

सप्तधान्य, सर्वोषधी, मध, , नाणी, विड्याचे पान, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, माती, पितळेचा किंवा तांब्या जव, तीळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे.

घटस्थापना कशी करावी:

घटस्थापना करताना देवीच्या तसबीरीची किंवा तुम्ही मुर्ती आणत असाल तर मुर्तीची स्थापन करावी. यानंतर माती पसरवून त्या मातीत सप्तधान्य मिसळावे या सप्तधान्यात जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी हे असावेत. यानंतर मातीवर कलश ठेवावा आणि कलशात तांदूळ फूल आणि गंगाजल अर्पण करावे. यानंतर कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. नंतर आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दिवा पेटवावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटावा आणि त्यात नारळ ठेवावा. हे करत असताना करैस्त्रि नयनां सर्वांग भूषावृताम। नीलाश्मद्युतिमास्य पाद दशकां सेवे महाकालिकाम, यामस्तीत स्वपिते हरो कमलजो हन्तुं मधुं कैटभम।।' या मंत्राचा जप करावा. यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती पठण करत असताना हे लक्षात ठेवा की, दुर्गा सप्तशती तीन भागात विभागले आहे त्यामुळे त्याचे पठन करताना एका चरित्राचे करावे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद