नवरात्री 2024

Navratri Special | सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर रेणुकामातेचे मंदीर आहे, जाणून घ्या रेणूका मातेची "ही" कथा...

देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण आणि मुळ शक्तीपीठ म्हणजे माहुरगड, सह्याद्रीच्या पर्वतारांगांमध्ये उंच शिखरावर रेणुकामातेच हे शक्तीपीठ आहे.

Published by : Team Lokshahi

देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण आणि मुळ शक्तीपीठ म्हणजे माहुरगड, सह्याद्रीच्या पर्वतारांगांमध्ये उंच शिखरावर रेणुकामातेच हे शक्तीपीठ आहे. आई रेणुकामातेच्या दर्शनासाठी देशभरातुन भाविक इथे येत असतात. नांदेड जिल्ह्यातील माहूरगड म्हणजे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण मूळ शक्तीपीठ असून साक्षात रेणुकामातेच इथे वास्तव्य आहे. याच ठिकाणी थोर तपस्वी जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी म्हणजे रेणुकामातेच वास्तव्य होतं अशी आख्यायिका आहे. जमदग्नी ऋषी या ठिकाणी तपश्चर्या करायचे. तपश्चर्येसाठी रेणुकामाता माहुरगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मातृतीर्थ तलावातुन पाणी आणायच्या, एके दिवशी रेणुकामातेला पाणी आणायला खूप उशीर झाला मत्रृतीर्थ तलावावर गंधर्व जलक्रीडा करीत होते.

त्यामुळे पाणी आणण्यास रेणुकामातेला उशीर झाला इकडे पाण्याविना अनुष्ठाण न होऊ शकल्याने जमदग्नी ऋषी अत्यंत क्रोधीत झाले. त्यांनी आपल्या मुलांना आईचा वध करण्याची आज्ञा दिली पण ते मुलाने ऐकली नाही. तेंव्हा काही वेळाने अरण्यात गेलेले परशुराम परतले जमदग्नी ऋषींनी त्यांना आईचा वध करण्याची आज्ञा केली. परशुरामांनी वडिलांची आज्ञा पाळत आई रेणुकामातेचा वध केला. प्रसन्न झालेल्या जमदग्नी ऋषींनी ईच्छीत फळ मागण्यास परशुरामांना सांगितले तेंव्हा परशुरामांनी आपली आई आपल्या परत देण्याची विनवणी केली. पण आपण देहरुपी मनुष्य असल्यामुळे हे होऊ शकत नसल्याने जमदग्नी ऋषींनी परशुरामांना वर दिले की तुला तुझ्या आईचे दर्शन होईल आईच्या दर्शनासाठी परशुराम विव्हळत होते.

आईचे दर्शन पाहिजे असतील तर कोरीभुमी असलेल्या ठिकाणी आईचे अंत्यसस्कार करण्यास जमदग्नी ऋषींनी सांगितले होते. कोरीभुमीच्या शोधात परशुराम दत्तप्रभुंकडे गेले तेंव्हा दत्तप्रभुंनी मातृतीर्थ तलावाजवळ अंतसंस्कार करण्यास सांगितले. स्वतः दत्तप्रभुंनी मातृतीर्थ तलावापाशी येऊन रेणुकातेचा अंतविधी केला आणि दोघेही आश्रमाकडे निघाले. पण जातांना माघे वळुन पाहु नको अशी आज्ञा दत्तप्रभुंनी पर्शुरामांना दिली, मात्र परशुरामाने आइच्या दर्शानाच्या आतुरतेने मागे वळून पाहीले , तेव्हा रेणुकामाता जमीनीतुन केवळ तोंडा पर्यंत प्रकट झाली होती त्यामुळेच रेणुका मातेची मूर्ती फक्त मुखापर्यंत आहे.

शक्तीपिठांपैकी एक मुख्य पुर्ण व मूळ पीठ असलेले माहुरगड अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अनेकांचे हे कुलदैवत आहे, भाविक नियमितपणे इथे देवीच्या दर्शनासाठी येतात. रेणुका मातेच्या दर्शानसाठी येणा-या भावीकांना प्रसाद म्हणुन पाणाचा विडा दिला जातो या पानाच्या विड्याला तांबुळ असे म्हटले जाते रेणुकामाता मंदिरात भगवान परशुरामांचा पाळना देखील आहे.नवरात्र उत्सवाच्या काळात रात्रंदीवस माहुर गडावर दर्शानासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा