नवरात्र स्पेशल रेसिपी

Navratri2024 Sweet Potato Kheer: नवरात्री गोड पदार्थ बनवताय? मग रताळ्याची खीर नक्की ट्राय करा...

नवरात्रोत्सवानिमित्त अनेक भक्त भावभक्तीने नवरात्रीचा उपवास करतात. उपवासादरम्यान बरेच लोक तेलात बनवलेले पदार्थ खातात. मग त्याच्यामध्ये अनेक पदार्थ येतात. या नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी रताळ्याच्या गोड खीरीचा घ्या आनंद.

Published by : Team Lokshahi

मधुरा बाचल | नवरात्रोत्सवानिमित्त अनेक भक्त भावभक्तीने नवरात्रीचा उपवास करतात. उपवासादरम्यान बरेच लोक तेलात बनवलेले पदार्थ खातात. मग त्याच्यामध्ये अनेक पदार्थ येतात. पूर्ण दिवस काही न खाता दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. यामुळे उपवासाला गोड पदार्थ खावेसे वाटू लागतात. गोड पदार्थांमध्ये कर्बोदक आणि प्रथिने असतात. यामुळे शरीरात ऊर्जा निमार्ण होते. या नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी रताळ्याच्या गोड खीरीचा घ्या आनंद.

रताळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

1 रताळे उकडलेले

1 1/2 कप दूध

१/४ कप साखर

1/4 टीस्पून वेलची पावडर

मिश्रित नट्स

रताळ्याची खीर बनवण्याची कृती:

सर्वात आधी रताळे प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत उकळवा. रताळे उकळल्यानंतर त्याची कातडी सोलून रताळे मॅशरने मॅश करा. कढईत मॅश केलेला रताळे घ्या. त्यात दूध आणि साखर घालून मिश्रण मिक्स करा. तयार केले उच्च आचेवर ठेवा आणि उकळी आणा. नंतर वेलची पावडर घाला, मिक्स करा. गॅस कमी करा आणि मध्यम आचेवर 10 मीटर उकळवा. गरम किंवा थंडगार सर्व्ह करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली