India

New Cabinet Minister of India 2021 LIVE | मोदी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Published by : Lokshahi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील 15 मंत्र्यांना कॅबिनेट तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.

असे आहे खातेवाटप

  • अमित शहा – मिनिस्ट्ररी ऑफ कॉ ऑपरेशन
  • पंतप्रधान मोदी – विज्ञान व तंत्रज्ञान
  • स्मृती इराणी – महिला व बालविकास मंत्रालय असेल
  • मनसुख मंडावियाआरोग्य व रसायन व खते मंत्रालय एकत्रित
  • पियुष गोयल – वस्त्रउद्योग मंत्री
  • अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्रालय
  • धर्मेंद प्रधानकेंद्रीय शिक्षण मंत्री
  • हरदीप सिंग पुरीशहरी विकास आणि पेट्रोलियम मंत्री पदी
  • मीनाक्षी लेखी – विदेश राज्यमंत्री ,सांस्कृतिक
  • अनुराग ठाकूर – माहिती आणि प्रसारण मंत्रालय , क्रीडा मंत्रालय , आणि युवा मंत्रालय
  • गिरीराज सिंह – ग्रामविकास मंत्रालय
  • पशुपती पारस – फुड प्रोसेसिंग मंत्रालय
  • ज्योतिरादित्य शिंदे – हवाई वाहतूक मंत्री
  • पुरुषोत्तम रुपाला – दूध आणि मत्स्य मंत्रालय
  • अनुराग ठाकूर – नवे केंद्रीय क्रीडामंत्री व माहिती आणि प्रसारण मंत्री
  • आसामचे माजी मुख्यमंत्री सोनोवाल – आयुष मंत्रालय व बंदर, शिपिंग व जलमार्ग
  • किरेन रिजिजू – नवे कायदेमंत्री
  • नारायण राणे – मध्यम आणि लघु उद्योग खातं
  • भागवत कराड – अर्थराज्यमंत्री
  • रावसाहेब दानवे-रेल्वे राज्य मंत्री
  • गजेंद्र सिंग शेखावत – नवे केंद्रीय जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री

  • भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री
  • कपिल पाटील – पंचायती राज राज्यमंत्री
  • प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री
  • सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री
  • राज कुमार सिंग – नवे केंद्रीय ऊर्जामंत्री
  • भारती पवार – आरोग्य कुटुंब आणि राज्यमंत्री
  • विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री
  • शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री
  • डॉ. मुंजपारा महेंद्रभाई – महिला बालकल्याण राज्यमंत्रिपद

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...