ताज्या बातम्या

ट्रेनमध्ये प्रवाशाकडे सापडले 1 कोटी 71 लाखाचे रोकड आणि दागिने; टिटवाळा आरपीएफची कारवाई

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून टिटवाळा आरपीएफ जवानांनी एक कोटी 17 लाखाची रोकड आणि 56 लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. जी. पी. मंडल असे या व्यापा:याचे नाव असून त्याच्याकडे सापडलेल्या रक्कमेची कागदपत्रे नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापाऱ्याला सूपूर्द केले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमजद खान, कल्याण

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून टिटवाळा आरपीएफ जवानांनी एक कोटी 17 लाखाची रोकड आणि 56 लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. जी. पी. मंडल असे या व्यापा:याचे नाव असून त्याच्याकडे सापडलेल्या रक्कमेची कागदपत्रे नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापाऱ्याला सूपूर्द केले आहे.

1 ऑक्टोबर रोजी लखनऊहून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकात हळू झाली. याचा फायदा घेत टिटवाळा एक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरला. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. या व्यक्तिची हाचलाची संशयास्पद होत्या. हे पाहून आरपीएफ जवानी एल. बी. बाग आणि शुभम खरे यांनी त्याला हटकले. त्याला टिटवाळा आरपीएफ कार्यालयात घेऊन गेले. या बाबत आरपीएफचे सिनिअर इन्स्पेक्टर अंजली बाबर यांनी या व्यक्तीची कसून चौकशी केली.

जी माहिती समोर आली ते ऐकून अधिकारी हैराण झाले. जी. पी. मंडल असे या व्यक्तिचे नाव असून तो नवी मुंबईतील कळंबोळी येथे राहतो. त्याचे मुंबईतील झवेरी बाजारात दुकान आहे. त्याच्याकडून आरपीएफ जवानांनी एक कोटी 17 लाखाची रोकड आणि 56 लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. रोकड आणि दागिन्याची कागदपत्रे त्याच्याकडे नाही. आरपीएफने याची माहिती आयकर विभागाला दिली. सध्या या प्रकरणाचा तपास आयकर विभाग करीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या