Chhattisgarh Team Lokshahi
ताज्या बातम्या

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाल्यांचा मोठा हल्ला, 11 जवान शहीद

घटनेत 10 सुरक्षा कर्मचारी आणि एका चालकासह 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.

Published by : Sagar Pradhan

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. हे जवान गस्त संपवून परतत होते. गस्तीवर गेले असता हे जवान पायी निघाले होते मात्र परतताना थकवा आल्याने त्यांनी पिकअप वाहनात लिफ्ट घेतली आणि परत आले. दंतेवाडा पोलीस अधीक्षकांनी नक्षलवाद्यांनी पुढे जात असताना केलेल्या या घटनेत 10 सुरक्षा कर्मचारी आणि एका चालकासह 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्डला गुप्त माहिती मिळाली होती. एका ठिकाणी नक्षलवाद्यी येणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, त्यामध्ये नक्षल्यांचे कमांडरही असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल रवाना करण्यात आलं होतं. त्याचवेळी नक्षलींनी जवानांच्या वाहानांवर आयईडीनं निशाणा साधला. नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजीच्या जवानांसह एका ड्रायव्हरचा समावेश आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा