Uddhav Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

राज्यातील राजकीय संकट : जाणून घ्या, आजच्या दहा मोठ्या बातम्या

Maharashtra political crisis : राज्यात राजकीय संकट सुरु आहे. शिवसेनेतील मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यांसोबत गेल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात आले आहे. आज या घडामोडीवरील दहा मोठ्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Published by : Team Lokshahi

राज्यात राजकीय संकट सुरु आहे. शिवसेनेतील मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यांसोबत गेल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात आले आहे. आज या घडामोडीवरील दहा मोठ्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

1)अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या- नाना पटोले

सविस्तर वाचा

2) बंडखोरांची समजूत काढण्यासाठी गेले रवींद्र फाटकही गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे. फाटकांसोबत संजय राठोड व दादा भुसे हे आमदारही हॉटेलमध्ये पोहचले आहेत.

सविस्तर वाचा

3)आमदारांना मुंबईत आणल्यास शिवसेनेकडून त्यांच्यांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे काही शिंदे समर्थक फुटण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपने प्लॅन-बी तयार केला आहे. यामुळे शिंदे गट गोव्यात जाणार आहे.

सविस्तर वाचा

4)नितीन देशमुख आमदारांसोबत चार्टर्ड विमानात बसलेले आणि विमानाबाहेरचे फोटो एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखांचा दाव्यावर प्रश्न उपस्थित होते.

सविस्तर वाचा

5)शिवसेना पक्ष आणि राज्यातली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड सुरु केली आहे. त्यामुळे आता शेवटचे अस्त्र म्हणून दोन पावले माघार घेत पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

सविस्तर वाचा

6)शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस (Congress) पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

7)वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आता नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.- बंडखोर आमदार

सविस्तर वाचा

8)एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे.

सविस्तर वाचा

9)उद्धव ठाकरेंच्या बैठकीत 17 तर एकनाथ शिंदेंकडे 42 आमदार. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 42 आमदारांचा व्हिडिओ जारी केला. दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकीला फक्त 17 आमदार होते.

सविस्तर वाचा

10)तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, तर त्यावर नक्की विचार करु. आणि यासाठी पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत (Mumbai) यावं. -संजय राऊत

सविस्तर वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा