ताज्या बातम्या

Gopichand Padalkar: इंदापूरात ओबीसी एल्गार मेळाव्यातील गोपीचंद पडळकरांच्या भाषणातील 10 मुद्दे

ओबीसी मेळाव्याला निसर्गाची साथ आहे, कारण आज शिरवळ पडलं आहे. आमचा एकच फिक्स डॉक्टर आहे, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या कायद्यावर आमचा विश्वास आहे.

Published by : Team Lokshahi

पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची पहिली ओबीसी एल्गार सभा पार पडली. या ओबीसी एल्गार मेळाव्यात सुरुवातीला धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर अनेक महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

गोपिचंद पडळकरांच्या भाषणातील 8 महत्वाचे मुद्दे

1. आमचा एकच फिक्स डॉक्टर आहे, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या कायद्यावर आमचा विश्वास आहे.

2. महाराज यशवंतराव होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन माणसं आपल्या आयुष्यात महत्त्वाची आहे. होळकर आंबेडकर फुले यांना जोडणारा धागा यशवंतराव होळकर हे आहेत.

3. महाराष्ट्रात सगळे ओबीसी एक व्हायला लागले आहेत, त्याचे सगळे श्रेय भुजबळ साहेबांना आहे. मेंढपाळ समाजाला मारहाण होते, त्यासाठी एक कायदा करणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्हाला भुजबळ साहेब यांची गरज आहे.

4. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे? मराठा समाजातील लोकांनी त्यांच्यातील सूर्याजी पिसाळ कोण आहे ओळखले पाहिजे? मराठा समाजाला कोण भडकावत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

5. ओबीसीच्या 22 योजना रखडल्या होत्या. भुजबळ साहेबांनी लक्ष घातल्यावर त्या मार्गी लागल्या आणि काही बाकी आहेत.

6. ओबीसी नेत्यांनी एक होऊन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे.

7. धनगर आरक्षणावर अतिक्रमण, गावबंदी ही संविधानाच्या विरोधात आहे.

8. भुजबळांच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. आम्ही 5 कोटी ओबीसी बांधव पाठीशी आहोत आणि आपण एकत्र राहिले पाहिजे.

9. आता पडापडीची भाषा सुरू झालीय. ओबीसींच्या हितासाठी भुजबळांच्या पाठिमागे उभे राहा. एका दिवसात हजारो कुणबी दाखले वाटत आहेत. सगळी ओबीसी नेते एकत्र व्हा, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

10. पुणे जिल्हा हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला असून,त्यामुळे आरक्षण बचाव आपण इथूनच सुरुवात करूयात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार