ताज्या बातम्या

आज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांचं 'कामबंद आंदोलन'

Published by : Siddhi Naringrekar

आज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकारी 'कामबंद आंदोलन' करणार आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करून 'ब' वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावं. या सर्व मागण्यांसाठी त्या अधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही