Board Exam Result Team Lokshahi
ताज्या बातम्या

Maharashtra SSC Result : विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार

विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार

Published by : Siddhi Naringrekar

दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा संपणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच  2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.  गेल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे इयत्ता दहावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिकृत संकेतस्थळावर उद्या निकाल पाहता येणार. उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाणार आहे.

कुठे पाहाल निकाल?


www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

महाराष्ट्र बोर्ड दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. बारावीचा निकाल 25 मे रोजी बोर्डाने जाहीर केला. आता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसले होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 17 जूनला जाहीर झाला होता. राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला होता. परीक्षेत मुलीनीच बाजी मारली होती. मुलींची उत्तीर्ण झाल्याचे टक्केवारी 95.35 तर मुलांची 93.29 टक्के इतकी होती. यंदा दहावीचा निकाल किती टक्के लागतो आणि त्यात मुली की मुले बाजी मारतात, याबाबत राज्यात मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, सन 2022 मध्ये दहावीच्या निकाला घसरण पाहायला मिळाली होती. सन 2021 मध्ये राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला होता.

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE 10th RESULTS)

  • महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

  • निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.

  • होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.

  • तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

दहावीचा निकाल कसा डाऊनलोड करणार (How to download Maharashtra SSC 10th Result 2023)

  • महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर 10वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

  • यानंतर रोल नंबर टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • आता विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा