ताज्या बातम्या

पनवेलमध्ये विसर्जन घाटावर ११ भाविकांना विजेचा झटका

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. काल बाप्पाना भक्तिभावाने विसर्जन करुन निरोप देण्यात आला. याचवेळी पनवेलमध्ये पनवेल पालिका क्षेत्रात कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शॉक लागला. पालिकेने विसर्जनघाटावर जनरेटरची सोय केली होती. याच जनरेटरची वीजवाहिनी तुटून भाविकांच्या अंगावर पडल्याने हा अनर्थ घडल्याचा प्राथमिक अंदाज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी सांगितले.

जखमींना पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तर शहरातील लाईफलाईन पटवर्धन व पटेल अशा विविध रुग्णालयात स्वयंसेवक घेऊन गेले. यावेळी पालिकेचे कर्मचारी असल्याने पालिका प्रशासनाने धावाधाव करुन भावीकांना वेळीच उपचार दिले.

कुंभारवाड्यातील राहणा-या ३२ वर्षीय हर्षद पनवेलकर व उलवे येथे राहणारा १७ वर्षीय मानस कुंभार याला लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले. मानस यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सूरु आहेत. तर उपजिल्हा रुग्णालयात पाच वर्षीय निहाल चोनकर, १५ वर्षीय सर्वेश पनवेलकर, ६५ वर्षीय दिलीप पनवेलकर, २४ वर्षीय दिपाली पनवेलकर, १८ वर्षीय वेदांत कुंभार, ३६ वर्षीय दर्शना शिवशिवकर तर जखमींमध्ये ९ महिन्याचे तनिष्का पनवेलकर या बाळाला स्वता पोलीस उपायुक्त पाटील व विजय कादबाने यांचे पथकाने दाखल केले. इतर जखमींपैकी ३५ वर्षीय रुपाली पनवेलकर आणि ३८ वर्षीय रितेश पनवेलकर यांना पटवर्धन रुग्णालयात पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके व गणेश शेटे यांच्यासह पालिकेच्या कर्मचा-यांनी दाखल केले.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...