ताज्या बातम्या

Delhi Building Collapsed : दिल्लीतील इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू; अजूनही बचावकार्य सुरू

ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार भागात शनिवारी एक बहुमजली निवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला.

Published by : Rashmi Mane

ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार भागात शनिवारी एक बहुमजली निवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले. दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. एनडीआरएफ, अग्निशमन सेवा, दिल्ली पोलीस आणि इतर बचाव कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी उपस्थित आहेत.

दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास २० वर्षे जुनी चार मजली इमारत कोसळली. ज्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला 12 तासांहून अधिक काळ उलटून गेले आहेत. मात्र बचावकार्य अजूनही सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत 22 लोकं राहत होते. येथील स्थानिक लोकंही ढिगारा हटवण्यास मदत करत आहेत. दुर्घटनेत इमारतीचा मालक तहसीन आणि त्याच्या कुटुंबातील सहा सदस्यांचा सहभाग आहे.

दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) एका निवेदनात म्हटले आहे की, ही इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती. जवळच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यांनी सांगितले की ते भूकंपासारखे होते आणि तळमजले हादरत होते. कोसळलेल्या इमारतीच्या शेजारी राहणारा शिव विहारचा रहिवासी रायन म्हणाला की, "आमच्या घरावर काहीतरी आदळल्यासारखे वाटले, पण जेव्हा आम्ही बाहेर पाहिले तेव्हा जवळची संपूर्ण इमारत ढिगाऱ्यात बदलली होती."

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी इमारत कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 'एक्स' वर म्हटले आहे की, "मुस्तफाबादमधील इमारत कोसळण्याच्या घटनेने खूप दुःख झाले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकसंतप्त कुटुंबांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

OBC : मराठा आरक्षणाच्या जीआरवर ओबीसी समाजाचा संताप, नागपुरात महामोर्चाची घोषणा

Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच पडद्यामागील हालचालींना वेग

Nitesh Rane On Aaditya Tackeray : "आदित्य ठाकरे उद्या बुरख्यातून मॅच बघेल" वरळीत कोळीवाड्यात नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ; कोणत्या दिवशी कोणता रंग? जाणून घ्या ...