ताज्या बातम्या

Ahmedabad Plane Crash : भयंकर! एक नव्हे दोन नव्हे तब्बल 12 कुटुंबियांना मिळाले दुसऱ्यांचे मृतदेह; अहमदाबाद विमान दुर्घटनेतील धक्कादायक प्रकार समोर

अहमदाबाद विमान अपघातातील 12 मृतांच्या पुन्हा केलेल्या डीएनए चाचणीद्वारे एक धक्कादायक माहिती मिळाली आहे, यात 12 मृतांच्या कुटुंबियांना दुसऱ्यांचे मृतदेह देण्यात आले आहेत.

Published by : Prachi Nate

अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी दुपारी झालेल्या एअर इंडियांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमानात 230 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर प्रवास करत होते. मात्र अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच काही सेकंदात हे विमान नजीकच्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल, तेथील विद्यार्थी डॉक्टर्स मिळून तब्बल 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरून गेला. हा अपघात इतका भीषण होता की, यात लोकांचे मृतदेह जळून खाक झाले होते. तर काहींचे अवशेष देखील सापडले नाही. त्यामुळे त्यांनी ओळख पटवणे कठीण जात होते. मात्र मृतांच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी डीएनए चाचणीची मदत घेण्यात आली आहे.

यादरम्यान अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिक होता. ज्यात ब्रिटिश नागरिकांचे मृतदेह लंडनमध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मृतांची पुन्हा डीएनए टेस्ट करण्यात आली, ज्यात एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

तब्बल 12 मृतांचे डीएनए टेस्ट हे मॅच नसून या 12 मृतांच्या कुटुंबियांना दुसऱ्याच व्यक्तींचे मृतदेह देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढचं नव्हे तर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले नाहीत. मृतदेह बदलण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अनेक कुटुंबियांना अंत्यसंस्कार कार्यक्रम रद्द केल्याची माहितीही समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Viral Video : रीलसाठी 'त्या' मुलीचा चालत्या कारवर डान्स; पोलिसांनी चालकासह तिलाही घेतलं ताब्यात

Maharashtra Rain : राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज