राज्यातील12 गडकिल्ल्यांचा जागतिक पातळीवर दखल घेत त्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून त्याबाबतची एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. ही महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.