Admin
ताज्या बातम्या

गुजरात पूल दुर्घटनेत भाजपा खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून सुमारे 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती .

Published by : Siddhi Naringrekar

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून सुमारे 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती . मोरबी इथल्या मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेत 132 जणांचा मृत्यू झाला आहे.

काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे 500 लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते.

या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: एका वृत्तसंस्थेला दिली आहे. “माझ्या बहिणीच्या परिवारातील एकूण १२ सदस्यांचा या दुर्घनटेत मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच छोट्या मुलांचाही समावेश आहे. असे मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी सांगितले की, “एनडीआरए, एसडीआरए तसेच स्थानिक प्रशासन नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. त्यासाठी काही रेस्क्यू बोटींची मदत घेण्यात आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी