ताज्या बातम्या

Sangli Drugs : सांगलीच्या इरळीतून 122 किलो ड्रग्ज जप्त, मुंबईच्या पोलीस पथकाची कारवाई

Published by : Dhanshree Shintre

कुपवाड मधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाई नंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला. एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारखान्यावर छापा टाकून सुमारे 245 कोटी रूपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गोपनियता राखत सदरची कारवाई केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील रहिवासी असलेला व सध्या पंधरा ते सतरा वर्षे मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मुख्य संशयीत हा ड्रग्ज तस्करी करीत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे इरळी, डोर्ली, ढालेवाडी व ढालगांव या चार गावांच्या सिमेवर व द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्ज तयार करण्यात येत असलेल्या कारखान्यावर छापा टाकत अड्डा उद्धवस्त केला.

मुंबई येथील ड्रग्ज रॅकेट कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात पोहचले आहे याची चर्चा सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आज शेत मालक वासूदेव लक्ष्मण जाधव रा. ढालेवाडी यास ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयीत ठाणे येथे रहात असल्याचे बोलले जात आहे. तर पोलिसानी ड्रग्ज तयार करणाऱ्या कच्च्या मालासह केमिकल, मशिनरी, मिस्कर असे सर्व साहित्य जप्त करत सहा संशयित कामगारांना ताब्यात घेतले आहे.

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट