ताज्या बातम्या

HSC Exam : बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात

Published by : Siddhi Naringrekar

बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. परीक्षा अकरा वाजता सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी हजर राहायचे आहे तर दुपारी परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित राहायचे आहे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. तसेच सीसीटीव्हीसुद्धा असणार आहे.

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nanded : नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे, संचालकाच्या घराची झाडाझडती सुरु

Summer Drinks: उन्हाळ्यात आवर्जून प्या 'हे' पेय

खासदार अमोल कोल्हे यांचा मालिका विश्वातून पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक

Padma Award 2024: महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आला समोर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...