पश्चिम रेल्वेवर आज 13 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड स्टेशनदरम्यान असलेल्या शंभर वर्षे जुन्या पूल क्रमांक ५ चे जुने स्टील गर्डर बदलण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या भागातील सर्व पाच मार्गिकांवर 12 मीटर लांबीचे 24 आरसीसी स्लॅब उभारण्यात येणार असून शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकमुळे शनिवारी 31 आणि रविवारी 72 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धिम्या मार्गावर धावणार असून तर काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या दादर आणि वांद्रे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.