Ajit Pawar on Jalgaon Accident 
ताज्या बातम्या

धक्कादायक! चहाविक्रेत्यामुळे जळगावात गेला 13 प्रवाशांचा जीव? अजित पवारांची माहिती

जळगावात पुष्पक एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरल्याने १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची अजित पवार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. चहाविक्रेत्यामुळे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Published by : Gayatri Pisekar

जळगाव जिल्ह्यामध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरल्याने डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उड्या मारल्या. या घटनेमध्ये समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं. या भीषण दुर्घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता नेमकी ही अफवा कशी पसरली याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी उत्तर प्रदेशच्या लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं पुष्कप एक्सप्रेस निघाली होती. या एक्सप्रेसमध्ये रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची अफवा पसरली. रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे एक्सप्रेसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हा प्रकार पाहून संपूर्ण बोगीत आणि आजुबाजूच्या बोगींमध्ये गोंधळ उडाला. हे पाहताच काही प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजुच्या दरवाज्यातून बाहेर उड्या मारण्याचा प्रयत्न केला. पण गाडीचा वेग जास्त असल्याने प्रवासी गाडीतून उतरू शकले नाहीत.

अखेर एका प्रवाशाने ट्रेन थांबवण्यासाठी चैन ओढून ट्रेन थांबवली. दोन जणांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. ते पाहताच एका प्रवाशाने रेल्वेची साखळी खेचली आणि रेल्वे थांबवण्यात आली. रेल्वे थांबल्याचं पाहताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. काही जण एक्सप्रेसमधून खाली उतरले. दरम्यान, बेंगळुरूवरून नवी दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. या संपूर्ण घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.

कशी पसरली अफवा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकी दुर्घटना कशी झाली? अफवा कुणी पसरवली? याविषयी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, पुष्पक रेल्वे मुंबईच्या दिशेनं जात होती. यावेळी जळगावातील पाचोऱ्याजवळ रसोई यान बोगीच्या चहा विक्रेत्याने आग लागली… आग लागली… अशा आरोळ्या दिल्या. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. घाबरून उदलकुमार आणि विजयकुमार या प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.

दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी १० जणांचं पूर्ण शरीर मिळालं आहे. तर तिघांच्या शरीराचे तुकडे झाले. १० जखमींमध्ये ८ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. अफवा पसरल्याने ही घटना घडली असून जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पाहा काय म्हणाले अजित पवार -

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर