New York Brooklyn Subway  
ताज्या बातम्या

न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर बेछुट गोळीबार, 13 जणांचा मृत्यू

Published by : left

न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबार (Brooklyn Subway Shooting) झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनवर झालेला हल्ला (Brooklyn Subway Shooting) हा दहशतवादी हल्ला आहे. या गोळीबारानंतर न्यूयॉर्कमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर (Brooklyn Subway Shooting) अमेरिकन वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर मेट्रोस्टेशनवर स्फोटही झाला आहे. त्यामुळे या परिसरासह शहरातील सर्व मेट्रो स्टेशनवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी न्यूयॉर्कमधून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनवर (Brooklyn Subway Shooting) झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला आहे. या घटनेनंतर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. न्यूयॉर्क पोलीस आणि एफबीआयने या घटनेचा तपास चालू केला आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेच्या मोर्चाआधी पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात

Maharashtra School : राज्यातील 5 हजार शाळा 2 दिवस राहणार बंद, कारण काय?

Avinash Jadhav : मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात

Onion Purchase From Farmers : 'केंद्र शासनाने थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा'; राज्याचे पणन मंत्री आणि कृषिमंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी