ताज्या बातम्या

Nagpur Accident : नागपूरच्या कोराडी मंदिराच्या स्लॅब कोसळला! ढिगाऱ्यात अनेक जण रक्ताने माखले तर...; जखमींच्या संख्येत एवढी वाढ

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील बांधकामाधीन महालक्ष्मी जगदंबा देवस्थान मंदिराच्या गेटचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना शनिवारी 9 ऑगस्टला घडली आहे.

Published by : kaif

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील बांधकामाधीन महालक्ष्मी जगदंबा देवस्थान मंदिराच्या गेटचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना शनिवारी 9 ऑगस्टला घडली आहे. रात्री 8:00 ते 8:15 च्या दरम्यान ही दुर्घटना खापरखेडा-कोराडी मंदिर रोडवर घडल्याचं समोर आली आहे. घटनेची माहित मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ इत्यादी पथक क्षणार्धात घटनास्थळी पोहोचली असून या पथकांकडून रात्रीपासून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत 17 कामगार जखमी झाले असून 3 कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण सध्या कळू शकलेले नाही, परंतु प्रशासनाने तज्ञांच्या पथकाला घटनास्थळी बोलावले आहे, जे संरचनेची तांत्रिक तपासणी करेल. घटनेच्या वेळी बांधकाम सुरू होते आणि सर्व कामगार स्लॅबजवळ काम करत होते. याचपार्श्वभूमिवर जवळपास 17 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत.

एएनआयला प्रत्यक्षदर्शी रत्नदीप रंगारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की, "स्लॅब पडताच लोक त्याखाली गाडले गेले. त्या ढिगाऱ्यातून 9 जणांना बाहेर काढले असून सर्व जण रक्ताने माखले होते. सध्या मंदिर संकुलाचे बांधकाम थांबवण्यात आले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच पुढील बांधकाम सुरू केले जाईल".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा