Sidhu Moosewala | murder case  Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुसेवाला हत्येच्या 1850 पानी आरोपपत्रात 24 मारेकऱ्यांची नावं

4 मारेकरी अजूनही परदेशात

Published by : Shubham Tate

sidhu musewala : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणी मानसा पोलिसांनी 1850 पानांचे सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात 36 पैकी 24 आरोपींची नावे आहेत. या संपूर्ण हत्येचा सूत्रधार गँगस्टर लॉरेन्सच्या नावाचाही आरोपपत्रात समावेश आहे. यासोबतच या प्रकरणात परदेशात बसलेल्या गोल्डी ब्रार, सचिन थापन, लिपिन नेहरा आणि अनमोल या चार गुंडांचीही नावे जोडली गेली आहेत. (1850 page chargesheet of sidhu musewala murder 24 murderer)

पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या सविस्तर आरोपपत्रात १२२ साक्षीदारांच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हत्येवेळी तेथे उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी, हत्येवेळी तेथे उपस्थित असलेले मित्र, मुसेवालाचे पोस्टमार्टम करणारे डॉक्टर, गोळीबार झालेल्या ठिकाणचे हॉटेल कर्मचारी अशा अनेकांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 शूटर्सचे एन्काउंटर झाले आहे.

लॉरेन्स बिश्नोई पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांची नावे समोर आली आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे तर गोल्डी ब्रार कॅनडात असल्याची माहिती आहे. इंटरपोलने गोल्डी ब्रारला रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दुसऱ्या मूसवाला खून प्रकरणात नाव समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेतले आहे.

या संपूर्ण कटाचा पोलीस शोध घेत आहेत

एका मोठ्या कटाचा भाग म्हणून मुसेवाला यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मानसाचे एसएसपी गौरव तुरा म्हणाले, एसआयटी या संपूर्ण कटाचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मुसेवाला यांचे जुने वैमनस्य होते का, यातूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर