Four Student Drowned Pune Team Lokshahi
ताज्या बातम्या

बुडण्याचं नाटक करतोय समजून मित्रांनी केलं दुर्लक्ष; काही मिनिटांत तरुणाचा...

Nagpur : दुपारी परिक्षा संपल्यावर कुणाल हा तरुण आपल्या मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेला होता.

Published by : Team Lokshahi

नागपूर : सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असून, अनेक ठिकाणी असलेले पाझर तलाव, धरण भरले आहेत. यामध्ये पोहायला जाणाऱ्या तरुणांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर येत असतानाच आता नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थी अंबाझरी तलावात बुडुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. कुणाल राजकुमार बर्वे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो आर.एस.मुंडले येथे वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

आज दुपारी परिक्षा संपल्यावर कुणाल हा तरुण आपल्या मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेला होता. यावेळी त्याचे मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले होते. मित्र पोहायला तलावात उतरल्यामुळे त्यालाही मोह झाला. कुणालही पोहण्यासाठी तलावात गेला. काही वेळातच तो बुडायला लागला. मित्रांना मात्र तो नाटक करत असल्याचं वाटलं. त्यामुळे कोणीही त्याच्या मदतीला गेलं नाही अन् पुढच्या काही क्षणात कुणाल दिसेनासा झाला. स्थानिक लोकांकडून तसंच मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार स्टंट करत असताना घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा