Accused of Saif Ali Khan 
ताज्या बातम्या

Saif Ali Khan चाकू हल्ला प्रकरणी २ संशयित ताब्यात

अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांपैकी एकाचे नाव शाहिद असून तो गिरगाव परिसरातून पकडला गेला आहे.

Published by : Gayatri Pisekar

थोडक्यात

  • पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव शाहिद असल्याची सुत्रांची माहिती

  • शाहिद याला गिरगाव परिसरातून घेतले ताब्यात

  • शाहिदवर या आधी ३-४ घरफोडीचे गुन्हे दाखल

अभिनेता सैफ अली खानवर यांच्यावर बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली. यानंतर सैफ यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसणारा आणि त्याच्याच सारखा दिसणारा दुसऱ्याला मुंबई पोलिसांनी पकडलं असल्याचं योगश कदम यांनी म्हटलं आहे. यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला सैफ अली खान हल्लाप्रकरणातीलच आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं नाही. मात्र, या प्रकरणाचा लवकरच छडा लावणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संशयित शाहिद कारपेंटर असून त्याच्यावर 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे

एका संशयिताचं नाव शाहिद असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावल्याचं त्याच्या पत्नीने म्हटलं आहे. तर तो कारपेंटर असल्याची माहिती समोर आली आहे. शाहिदवर यापूर्वीही 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात सरकार आणि पोलीस प्रशासनात समन्वयाचा अभाव?

दरम्यान, मुंबई पोलीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली आहे. मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून मात्र हल्लेखोरास ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. संशयित आरोपीला वांद्रे पालिसांनी दुसरीकडे हलवल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा