ताज्या बातम्या

Parbhani : कुलर ठरला किलर! घरगुती लोखंडी कुलरचा शॉक लागून 2 महिलांचा मृत्यू

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे विजेचा शॉक लागून दोन महिलांचा मृत्यू. घरगुती लोखंडी कुलरचा शॉक लागल्याने दोघी सख्ख्या जावा मृत्यूमुखी.

Published by : Prachi Nate

विजेचा झटका लागून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे घडली आहे. घराची साफसफाई करत असताना घरगुती लोखंडी कुलरचा शॉक लागून दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना.

बिस्मिलाबी इस्माईल शेख वय ५८ वर्ष, शेख जहुराबी शेख युसुफ वय ५२ वर्ष असं या दोन मुस्लिम महिलांची नावं आहेत. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख जहूराबी आपल्या घराची साफसफाई करत असताना त्यांचा ओला हात कुलरला लागला ज्यामुळे कुलरमध्ये सुरु असलेल्या विद्युत प्रवाहने त्यांना खेचले आणि त्यांना त्याचा झटका लागू लागला.

तर दुसरीकडे बिस्मिल लाबी इस्माईल शेख यांनी आपल्या जावेला शॉक लागत असल्याचं पाहिलं त्या तात्काळ आपल्या जावेच्या दिशेने धावत गेल्या आणि त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करु लागल्या. ज्यामुळे त्यांना देखील कुलरचा शॉक लागला. यामुळे दोघी जावा मृत्यूमुखी पडल्या. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथील या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा