Bhandara Latest News Google
ताज्या बातम्या

Bhandara : भंडारा जिल्ह्यात धक्कादायक घटना! वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, चार जण जखमी

भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

Published by : Naresh Shende

Bhandara Latest News: भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कलाबाई गोखले आणि आशा सोनकुसरे असं मृत महिलांचं नाव आहे. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही दुर्देवी घटना माहोळी तालुक्यातील आंदळगाव येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मोहाळी तालुक्यातील आंदळगाव येथे परे रोवणीचा काम सुरु होता. दुपारच्या वेळी मजूर शेतात रोवणी करत होते. त्याचदरम्यान अचानक आकाशात वीजेचा कडकडाट झाला आणि मजूर महिलांच्या अंगावर वीज कोसळली. त्यानंतर या महिलांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा