मागील काही दिवसात नागपूर शहर आणि लगतच्या जिल्ह्या आणि राज्यातून उपचारार्थ आलेल्या मेंदूज्वर संशयित 20 रुग्ण मिळू आले आहे. यात आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. यात मध्यप्रदेशमधील 10 रुग्ण आहे, यात नागपूर शहर 2 ग्रामीण 3, अकोला 1, भंडारा 2, गडचिरोली 1, अश्या घटना आहे. यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला असून यात आणखी एका मुलाची संख्या वाढून आकडा 10 वर गेला आहे.
यामध्ये पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील तीन सदस्य पथकाने नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी केली, नमुनेही गोळा केले होते. मात्र त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. जीएमसी, एम्स, रुग्णलायतून रुग्णाचा डेटा घेऊन गेले. मुलांची हिस्ट्री सुद्धा घेतली आहे. यामध्ये अनेक रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण मेंदूजवर आहे की नाही, या ठोस निर्णयावर पोहचले नसल्याचं आरोग्य उपसंचालक यांनी सांगितलं.
यात आणखी काही वयस्कर आणि लहान मुलाचे नमुने घेऊन घेतले आहे. यात काही मॉस्किटो, युवा मेंदू ज्वर पसरवत असलेल्या डासांचे नमुने व्हायरलॉजीच्या टीमने घेतलेले आहे. मात्र त्याचे रिपोर्ट अजून आलेले नाही. त्यात महाराष्ट्राचे चार मृत्यू, छिंदवाड्याचे पाच रुग्णांची मृत्यू आहे. यात मुलाच्या मृत्यूमध्ये व्हायरसने मृत्यू असे काही निष्कर्ष अजून आले नाही.