मजुरांच्या माध्यमातून २ हजारांच्या नोटा बदलवण्याचे रॅकेट उघडकीस आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. मजुरांना काही पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखोंच्या नोटा बदलवण्याचे काम करून घेतले जात होते. मुख्य आरोपी अनिलकुमार जैन हा दिल्ली आणि उत्तरप्रदेशातून २ हजारांच्या चलनी नोटा आणत होता.
ज्यांच्याकडे अजूनही नोटा आहेत, त्यांनी आरबीआयमध्ये आपला पत्ता, आधारकार्ड देऊन नोटा बदलवून देण्यात येतात. मात्र, त्यासाठी २० हजार रुपये अशी मर्यादा घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूर, बेलापूर आणि मुंबई या तीन ठिकाणी नोटा बदलून घेण्यात येते. तसेच याचा संबंध थेट दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यांशी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
कोणा कोणाचा समावेश होता
यामागे व्यापाऱ्यांचा हात असून त्यांचा कर्ताधर्ता हा अनिलकुमार जैन असल्याचे समोर आले आहे. अनिलकुमार जैन याने नोटा बदलण्यासाठी नागपुरातील नंदलाल मोर्या, रोहित बावणे आणि किशोर बहोरीया यांना हाताशी धरले असून त्याच्यासोबत रा. सीताबर्डी, रा. शांतीनगररा. झिंगाबाई टाकळी यांचा देखील समावेश होता.
आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलविल्या
अनिलकुमार जैन मध्यप्रदेशात फाटलेल्या नोटा कमी पैशात घेऊन बँकेत बदलविण्याचे काम करायचा तसेच दिल्ली, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात अशा राज्यातील व्यापाऱ्यांकडून तो दोन हजार रुपयांच्या नोटा आणायचा. तो एक लाख रुपयांवर वीस हजारांचे कमिशन घेत असून नागपुरातील रोहित, किशोर आणि नंदलाल या तिघांना प्रत्येक मजुरामागे एक हजार रुपये देत होता.
तसेच महिलांना देखील यामध्ये 300 रुपये मिळत असल्याची माहिती समोर आली. गेल्या तीन महिन्यांपासून नोटा बदलविण्यासाठी आरबीआयमध्ये महिलांची अचानक गर्दी वाढायला लागली. या रॅकेट बद्दल ठाणेदार मनिष ठाकरे यांना भनक लागली त्यामुळे या सगळ्यांना ताब्यात घेण्यासाठी आणि सर्व डाव उघडकीस आणण्यासाठी त्यांनी सापळा रचून काही महिलांना ताब्यात घेतले.