ताज्या बातम्या

BRSच्या मंचावरुन बांधली जाणार चौथ्या आघाडीची मोट

Published by : Siddhi Naringrekar

तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची आज खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने 'बीआरएस' असं नाव बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच जाहीर सभा आहे. या सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) नेते के डी राजा उपस्थित राहणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतर नेते बुधवारी खम्ममला जाण्यापूर्वी हैदराबादजवळील यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट देतील. सभेसाठी हजर राहणारे नेते हैदराबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये तेलंगणा सरकारच्या नेत्र तपासणी कार्यक्रमाच्या कांती वेलुगुच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

त्यात बीआरएस, आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी (एसपी) यांच्यासह विविध विरोधी पक्षांचीही हजेरी असणार आहे. डाव्या पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसतील. सभेसाठी हजर राहणारे नेते हैदराबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये तेलंगणा सरकारच्या नेत्र तपासणी कार्यक्रमाच्या कांती वेलुगुच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. असे वरिष्ठ बीआरएस नेते आणि माजी खासदार बी विनोद कुमार म्हणाले.

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याआधी युवराज सिंगचं मोठं विधान, म्हणाला; "विराट कोहली वर्ल्डकप मेडल..."

Daily Horoscope 10 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना अक्षय तृतीयाचा दिवस शुभ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 10 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना